वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाकडून कनिष्ठ राष्ट्रीय निवड समिती सदस्यासाठी 14 एप्रिल रोजी अर्ज मागविण्यात आले होते. भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळेने या पदासाठी आपला अर्ज बीसीसीआयकडे पाठविला आहे.
कनिष्ठ क्रिकेट राष्ट्रीय निवड समितीत पाच सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. इच्छुकांना 26 एप्रिलपर्यंत या पदासाठी अर्ज पाठविण्याची सूचना बीसीसीआयने केली होती. विनोद कांबळी निवड समिती सदस्यपदासाठी इच्छूक आहे. माजी कसोटीवीर विनोद कांबळीने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत 17 कसोटी, 104 वनडे सामन्यांत 1990 च्या दशकामध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. 49 वर्षीय विनोद कांबळीने कसोटी क्रिकेटमध्ये 4 शतकांसह 1084 धावा जमविल्या आहेत तसेच त्याने वनडे क्रिकेटमध्ये दोन शतके आणि 14 अर्धशतकांसह 2477 धावा जमविल्या आहेत. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये कांबळीने 129 सामन्यांत 59.67 धावांच्या सरासरीने 35 शतके आणि 44 अर्धशतकांसह 9965 धावा जमविल्या आहेत. मुंबई क्रिकेट संघटनेचा विनोद कांबळी हा विद्यमान सदस्य आहे.