बेळगाव : गोवा येथे झालेल्या गोल्ड इन कराटे राष्ट्रीय कराटे स्पर्धेत वर्ल्ड कॉम्बॅट मॅरिटल आर्ट्स ऍण्ड सुपर कराटे बेळगावच्या मनान सुभेदारने सुयश मिळविले.
पद्मा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हापसा, गोवा येथे झालेल्या शुटोकॉन कराटे डू आयोजित या राष्ट्रीय स्पर्धेत मनान सुभेदारने सुवर्णपदक मिळविले. मनान हा आरएलएस महाविद्यालयाचा विद्यार्थी असून त्याला ग्रॅण्डमास्टर महेंद्रकर एस. एम. व राष्ट्रीय प्रशिक्षक प्रज्ञा एम. यांचे मार्गदर्शन लाभले आहे.