प्रतिनिधी / सातारा :
महाराष्ट्र किकबॉक्सिंग स्पोर्टस् असोसिएशन यांच्यामार्फत अहमदनगर येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या आलेल्या स्पर्धेत सातारच्या स्पर्धकांनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत सातारच्या स्पर्धकांनी तीन सुवर्ण पाच रौप्य व दोन कांस्यपदके संपादित करत राज्यात जिल्हय़ाचे नाव उंचाविले आहे.
यामध्ये सिध्देश हुंबरे, यश नडे, तुषार पवार यांनी सुवर्ण पदके, तर दिपक सुर्वे, अनिकेत साळोखे, प्रितम सावंत, किरण कदम, निशांत केडे यांनी रौप्य व प्रतिक मोरे, मिलिंद सोनावणे यांनी कांस्य पदके मिळविली आहेत. यामधील सुवर्ण पदक संपादन केलेल्या तीन खेळाडुंची निवड ही दि. 27 ते 29 ऑगस्ट दरम्यान गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेकरीता झाली आहे. या खेळाडूंचा सराव क्रिडा भारती बॉक्सिंग क्लब शनिवार पेठ सातारा येथे झाला. त्यांना प्रशिक्षक तेजस यादव यांचे मार्गदर्शन लाभले.