क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
झारखंड राज्य कुस्ती संघटना व कुस्ती फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 15 वर्षाखालील राष्ट्रीय ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेसाठी हलगा बस्तवाडची कुस्तीपटू लक्ष्मी संजय पाटील हिची कर्नाटक संघात निवड झाली आहे.
गदग येथे झालेल्या राज्यस्तरीय निवड चाचणीत 54 किलो वजनी गटात लक्ष्मी पाटील हिने उल्लेखनीय कामगिरी करून निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. तिने केलेल्या सर्व कुस्त्यातून बायफॉल्ट व प्रतिस्पर्धीचा जास्तीतजास्त गुणांनी पराभव करून अंतिम फेरीत मजल मारली होती. अंतिम सामन्यात तिच्याच प्रतिस्पर्ध्याला 8-1 अशा गुण फरकाने विजय मिळवून स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले होते. त्याचप्रमाणे राज्यात ठिकठिकाणी झालेल्या कुस्ती मैदानात महिलांच्या गटात विजेतेपद पटकावित तीन गदेची मानकरी ठरली आहे. तिची ही कामगिरी पाहूनच कर्नाटक राज्य कुस्ती निवड समितीने झारखंड येथे 27 ते 29 मे दरम्यान होणाऱया राष्ट्रीय 15 वर्षाखालील मुला-मुलींच्या ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तिला तुकाराम गौडा व के. एन. पाटील यांचे मार्गदर्शन लाभते. ती सहय़ाद्री कुस्ती संकुल येथे सराव करीत आहे. राष्ट्रीय स्पर्धेतही ती पदक मिळवेल, अशी आशा करण्यात येत आहे.