प्रतिनिधी/ औंध
कर्नाटक (बेल्लोरी) येथे झालेल्या सब ज्युनियर मुली आणि ज्युनियर मुलींच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने प्रथमच दोन्ही विभागात सांघिक विजेतेपद मिळवून विजयाचा डबल बार उडवून दिला आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेचे सन्मानीय अध्यक्ष पद्मश्री श्री शरदराव पवार साहेब व सरचिटणीस, प्रो. बाळासाहेब लांडगे व सर्व कार्यकारणी सदस्य यांच्याकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या व प्रशिक्षकांच्या निरंतर प्रयत्नांना चांगले यश या स्पर्धेत मिळाले आहे. उत्तर भारतातील महिला संघाचे कडवे आव्हान असताना महाराष्ट्रातील मुलींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. सब ज्युनियर मुलींनी ( 108 गुण ) व ज्युनियर मुलींच्या ( 130 गुण ) मिळवून राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाला सांघिक विजेतेपद मिळवून दिले .
पदक प्राप्त महिला कुस्तीगीर खालील प्रमाणे ः सब-ज्यूनियर मुली.
श्रुती येवले – 43 किलो – कांस्यपदक, नेहा चौगले – 46 किलो – कांस्यपदक, सिद्धी खोपडे – 65 किलो – कांस्यपदक, साक्षी पाटील – 57 किलो – कांस्यपदक, तन्वी गुंडेश मगदूम – 49 किलो – कांस्यपदक
– महाराष्ट ( A )संघ
कल्याणी पाडुरंग गादेकर-49 किलो – कांस्यपदक,
– महाराष्ट संघ
धनश्री हनुमंत फंड – 53 किलो- कांस्यपदक,
पल्लवी अनिल पोटफोडे -61 किलो – रौप्यपदक,
ज्यूनियर मुलीं ः –
संजना खंडू बागडी – 76 किलो- कांस्यपदक, विश्रांती पाटील – 55 किलो – कांस्यपदक,
सृष्टी भोसले – 62 किलो – रौप्यपदक, गौरी जाधव – 65 किलो – रौप्यपदक.
पदक प्राप्त कुस्तीगीरांचे भारतीय कुस्ती महासंघाच्या हरियाणा येथील राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रात निवड झाली आहे .
विजेत्या महिला कुस्ती संघाचे
कुस्तिगीर परिषदेचे अध्यक्ष शरदराव पवार, कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, सरचिटणीस , प्रो. बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे कार्यकारणी सदस्य यांनी अभिनंदन केले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून दादासो लवटे , संदिप पठारे , माधुरी घराळ , पै. किरण मोरे , संदिप पाटील, राजेंद्र कणसे यांनी काम पहिले.