क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
गदग येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती निवड चाचणीत बेळगावच्या रत्नकुमार मठपती कुस्ती केंद्राच्या चार मल्लांची अमेठी, उत्तरप्रदेश येथे होणाऱया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
गदग येथील निवड चाचणीत 23 वर्षाखालील मल्लांची निवड चाचणी घेण्यात आली. या चाचणीत 100 हून अधिक मल्लांनी भाग घेतला होता. त्यामध्ये बेळगावच्या रत्नकुमार मठपती आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राचे चार मल्ल रूपेश कुगजी (55 किलो गट), शिवाप्पा जंबगी (60 किलो गट), शिवय्या पुजारी (97 किलो गट) तर फ्री स्टाईल प्रकारासाठी संगमेश बिराजदार (97 किलो गट) यांची कर्नाटक कुस्ती संघात निवड झाली आहे.
16 ते 19 सप्टेंबर दरम्यान होणाऱया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी हे खेळाडू रवाना होणार आहेत. वरील सर्व मल्ल सावगांव येथील खेलगाव येथे रत्नकुमार मठपती आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्रात सराव करत असून त्यांना डबल कर्नाटक केसरी व प्रशिक्षक रत्नकुमार मठपती व शंकऱयाप्पा पुजारी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे.