56 वी राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कारवार जिल्हय़ातील यल्लापूर येथे झालेल्या 56 व्या राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंनी यश संपादन केले असून नागालँड येथे होणाऱया राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी ते पात्र ठरले आहेत.
यल्लापूर येथे झालेल्या या क्रॉसकंट्री स्पर्धेत अरूण माळवीने 8 कि. मी. क्रॉसकंट्री स्पर्धेत पहिला क्रमांक पटकाविला. दिग्गज
ऍथलिट्सनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यामुळे, स्पर्धेबद्दल विविध स्तरावर विशेष उत्सुकता होती. टीना वानखडे हिने 6 कि. मी. क्रॉसकंट्री स्पर्धेत चौथा क्रमांक पटकाविला. शितल काकतीकरला 15 व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
18 वर्षाखालील गटात लक्ष्मण पाटीलने या क्रॉसकंट्री स्पर्धेत चौथे स्थान पटकाविले. अरूण माळवी, टीना वानखडे, व लक्ष्मण पाटील या खेळाडूंची नागालँड येथे होणाऱया राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड झाली. या सर्व खेळाडूंना ऍथलेटिक्स प्रशिक्षक एम. बी. शिंत्रे यांचे मार्गदर्शन लाभले.