शासनाकडून महापालिकेत दोन अधिकाऱयांची नियुक्ती
प्रतिनिधी/ बेळगाव
दर दहा वर्षांनी राष्ट्रीय जनगणती करून लोकसंख्येची घोषणा करण्यात येते. याकरिता मागील डिसेंबरपासून शहरात जनगणतीचे काम सुरू करण्यात येणार होते. मात्र कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याने हे काम रखडले होते. मात्र शासनाकडून महापालिकेत दोन अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली असून, जनगणतीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
शहरातील जनगणतीसाठी महापालिकेच्यावतीने आवश्यक तयारी सुरू करण्यात आली होती. जानेवारीमध्ये पहिल्या टप्प्यात घरांची मोजणी, त्यानंतर एप्रिल महिन्यात कुटुंबातील सदस्यांच्या संख्येचा तपशील घेण्यात येणार होता. याकरिता अधिकाऱयांची नियुक्ती करून गणतीदार नेमणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र त्याच दरम्यान कोरोनाचा प्रसार सुरू झाल्याने सदर कार्यवाही ठप्प झाली होती. मार्च-2021 मध्ये राष्ट्रीय जनगणतीचा घोषवारा करण्यात येणार होता. मात्र गणती झाली नसल्याने लोकसंख्येचा घोषवारा पुढील जनगणतीनंतर होणार आहे. जनगणतीसाठी आवश्यक तयारी सांख्येतिक विभागाने चालविली आहे.
महापालिकेत सांख्येतिक विभाग असून येथील पदे रिक्त आहेत. मात्र जनगणतीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत दोन अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. साहाय्यक निर्देशक म्हणून जी. व्ही. सुक्ते आणि साहाय्यक जनगणती अधिकारी म्हणून व्ही. एम. भरमण्णावर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जनगणतीच्या कामास लवकरच प्रारंभ होण्याची शक्मयता आहे.
राष्ट्रीय जणगणतीबाबत शासनाने अद्याप कोणतीच सूचना दिली नाही. मात्र जानेवारीनंतर जनगणतीस प्रारंभ होण्याची शक्मयता असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. घरोघरी जाऊन सदस्यांची माहिती घेण्यासाठी गणतीदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रथम घरांची नोंद, त्यानंतर कुटुंबातील सदस्यांची आकडेवारी व तपशील घेतला जाणार आहे. त्यामुळे जनगणतीचे काम तीन ते चार महिने चालण्याची शक्मयता आहे.