क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
नागपूरात कालपासून सुरू झालेल्या 32व्या राष्ट्रीय सीनियर टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या लीग सामन्यात गोव्याच्या पुरूष संघाने विजयी सलामी दिली. पहिल्या लीग सामन्यान गोव्याने महाराष्ट्रचा 8 विकेट्सनी पराभव केला. गोव्याच्या विजयात नमेश काणकोणकर, अजय हळगेकर व आकाश भंडारीने मोलाचा वाटा उचलला. गोव्याने नाणेफेक जिंकून महाराष्ट्रला प्रथम फलंदाजी दिली. महाराष्ट्रने निर्धारीत 8 षटकात 6 बाद 39 धावा केल्या. गोव्यासाठी आकाश भंडारीने 3 धावात 2 तर ऋषभ भंडारी व यश आनंदने प्रत्येकी एक गडी बाद केला. त्यानंतर गोव्याने केवळ 4 षटकातच बिनबाद 43 धावा फटकावून सहज विजय प्राप्त केला. गोव्यासाठी अजय हळगेकरने नाबाद 22 तर नमेश काणकोणकरने 16 धावा केल्या.