वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पतियाळा येथे 26 आणि 27 ऑक्टोबर रोजी आयोजित केलेली पहिली राष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धा बेमुदत कालावधीसाठी लांबणीवर टाकल्याची घोषणा अखिल भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनने केली आहे.
सदर स्पर्धा देशामध्ये राष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच आयोजित केली होती पण कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर स्पर्धा आयोजकांनी प्रमुख प्रशिक्षक तसेच स्पर्धा संचालक आणि अन्य प्रशिक्षकांचा सल्ला घेतला. प्रमुख प्रशिक्षकांनी सदर स्पर्धा घेवू नये, ही स्पर्धा घेण्यासाठी अद्याप वातावरण योग्य नसल्याचे असे मत व्यक्त करण्यात आले. अखिल भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनने 2020 च्या ऍथलेटिक्स हंगामातील सर्व स्पर्धा कोरोनाच्या भीतीमुळे यापूर्वीच रद्द केल्या आहेत. त्यामुळे आता चालू वर्षीचा ऍथलेटिक हंगाम स्पर्धाविना संपणार आहे. नोव्हेंबर महिन्यात काही विभागीय स्पर्धा तसेच विजयवाडा येथे डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय युवा चॅम्पियन्सशीप स्पर्धा मात्र घेतली जाणार आहे.