प्रतिनिधी /म्हापसा
अर्धापूर-नांदेड येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालयाच्या मराठी विभागाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय निंबंधलेखन स्पर्धेत मांदे-पेडणे येथील रहिवासी तथा कुजिरा-पणजी येथील हेडगेवार विद्यालयातील शिक्षका अक्षता आनंद किनळेकर यांना प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा निबंध त्यांनी गोमंतकीय साहित्यकि शीतल साळगावकर या व्यक्तिमत्त्वावर लिहिला होता.
तेथील माजी आमदार तथा श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी, नांदेडच्या उपाध्यक्ष अमिताताई अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. द्वितीय पारितोषिक नंदूरबार येथील वकील मुकेश आपसिंग पावरा व पुणे येथील सुवर्णा महावीर ठोंबरे यांना, तर तृतीय पारितोषिक अर्धापूरच्या नरेश उत्तम थोरात यांना जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेच्या आयोजनात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. पाटील व स्पर्धेचे समन्वयक डॉ. हनुमंत भोपाळे व सहसमन्वयक डॉ. लक्ष्मण वाघमारे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. प्रा. डॉ. साईनाथ शेटोड, प्रा. डॉ. रघुनाथ शेट्टे व प्रा. संतोष हंकारे यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.