क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
काझीकोडा केरळ कालीकत युनिव्हर्सिटी येथे घेण्यात आलेल्या पहिल्या पॅरा मास्टर राष्ट्रीय आऊट डोअर जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्विमर्स क्लबचे दिव्यांग जलतरणपटू श्रीकांत देसाई यांनी 3 सुवर्णपदकांसह घवघवीत यश संपादन केले.
श्रीकांत देसाई हे सैन्यदलात जम्मू काश्मीर येथे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर सेवा बजावत असताना त्या ठिकाणी अपघात घडला. त्या अपघातात श्रीकांत देसाई यांच्या छातीपासूनचा खालील भाग लुळा झाला. त्यामुळे त्यांनी आशा सोडली होती. पण दिव्यांग मुलांना पोहताना पाहून ते ही जलतरणाकडे वळले आणि राष्ट्रीय स्तरावर सुयश प्राप्त केले.
केरळ येथे झालेल्या पॅरा मास्टर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत 50 मि. फ्री स्टाईल, 50 मी. बॅकस्ट्रोक, 100 मी. बॅकस्ट्रोक या तीन गटात सुवर्ण पटकाविले. श्रीकांत देसाई हे रोज 3 ते 4 कि. मी. पोहण्याचा सराव जेएनएमसी जलतरण तलावात सराव करीत असून, त्यांना प्रशिक्षक उमेश कलघटगी, गोवर्धन काकतीकर, नितीश कुडुचकर यांचे मोलाचे मार्गदर्शन तर माजी खासदार प्रभाकर कोरे, केएलईचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी, रोटे, अविनाश पोतदार, सुधीर कुसाने यांचे प्रोत्साहन लाभत आहे.