बेळगाव : राजस्थान येथील उदयपूर येथे झालेल्या 21 व्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत बेळगावचा जलतरणपटू श्रीधर माळगी याने 5 सुवर्णपदके पटकावित घवघवीत यश संपादन केले.
उदयपूर राजस्थान येथे झालेल्या 21 व्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत श्रीधर माळगीने 50 मीटर फ्रीस्टाईल, 100 मीटर बटरफ्लाय, 200 मीटर वैयक्तिक मिडले, 4ƒ100 मिडले रिले, 4ƒ100 फ्रीस्टाईल रिलेमध्ये सुवर्णपदके मिळविली. श्रीधरला जलतरण प्रशिक्षक शरद गायकवाड बेंगळूर, उमेश कलघटगी यांचे मार्गदर्शन लाभले असून, गो स्पोर्ट्स फौडेशन बेंगळूर यांचे प्रोत्साहन लाभत आहे.