प्रतिनिधी/ कराड
राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचाऱयांच्या वतीने राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना सुरू करण्याकरिता आयोजित केलेल्या राज्यव्यापी ठिय्या आंदोलन प्रसंगी ते बोलत होते. सुरुवातीला शासकीय तंत्रनिकेतन कराड आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे घोषणा देऊन तीव्र निदर्शने करण्यात आली. त्यानंतर शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय कराड येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले.
नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू होणाऱया कर्मचाऱयांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली असून ती अन्यायकारक आहे. ही योजना लागू झाल्यापासून मृत्यू झालेल्या अनेक कर्मचाऱयांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. तसेच मयत कर्मचाऱयांना मदत मिळण्यासाठी प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयामधील अटी आणि शर्ती या कर्मचाऱर्यांची अवहेलना करणाऱया आहेत. त्यामुळे नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू होईपर्यंत आपण निकराने लढा देऊन प्रसंगी संप करू, असा इशारा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभाग कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दिलीप कांबळे यांनी दिला
यावेळी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभाग कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष राजेश गायकवाड व उपाध्यक्ष संजय उबाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर ठिय्या आंदोलनाकरीता शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामधील सर्व कर्मचारी, अधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. स्वागत एस.एम. ताटे यांनी केले तर आभार बबन सूर्यवंशी यांनी मानले.