अर्थमंत्री सीतारामन यांनी 2020 च्या अर्थसंकल्पात राष्ट्रीय पोलीस विद्यापीठाच्या प्रस्तावाचा उल्लेख केला आहे. ग्रेटर नोएडात निर्माण होणारे हे विद्यापीठ जागतिक स्तराचे राहणार आहे. या विद्यापीठात शिक्षण तसेच काम करण्याशी संबंधित अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील. पोलीस विज्ञान आणि संबंधित क्षेत्रांमध्ये शिक्षण आणि संशोधनाची उच्चस्तरीय व्यवस्था असणार आहे. हे देशातील पहिले केंद्रीय पोलीस विद्यापीठ ठरणार आहे.ग्रेटर नोएडाच्या आयटी पार्कमध्ये एकरच्या भूखंडावर राष्ट्रीय पोलीस विद्यापीठाची उभारणी होणार आहे.
अभ्यासक्रम
या विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी औपचारिक शिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत पदवी, पदव्युत्तर आणि संशोधन पदवीसह पोलीस विज्ञान, सायबर फोरेन्सिक, गुन्हेशास्त्र, अपराध-न्याय, न्यायवैद्यक, जोखीम व्यवस्थापन आणि संबंधित विषयांच्या क्षेत्रात पदव्युत्तर डिप्लोमा प्रदान करण्यात येणार आहे.
उद्देश
पोलीस विज्ञान, फोरेन्सिक विज्ञान, सायबर फोरेन्सिग, गुन्हेशास्त्र, अपराध न्याय, जोखीम व्यवस्थापन आणि संबंधित क्षेत्रात उच्च गुणवत्तेचे शिक्षण, संशोधनासह अत्याधुनिक राष्ट्रीय पोलीस विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार आहे.