नवी दिल्ली : डेन्मार्क येथे 3 ते 11 ऑक्टोबर दरम्यान होणाऱया थॉमस-उबेर चषक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी हैदराबादमध्ये आयोजित राष्ट्रीय बॅडमिंटन शिबीर रद्द करण्यात आले.
सदर राष्ट्रीय बॅडमिंटन सराव शिबीर साईच्या पी. गोपीचंद अकादमीमध्ये घेतले जाणार होते. सुरवातीला हे शिबीर 7 ते 27 सप्टेंबर दरम्यान घेतले जाणार होते. पण बॅडमिंटनपटूंना सात दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीमध्ये कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याने हे सराव शिबीर अखेर रद्द करण्यात आले आहे. कोरेना महामारी परिस्थितीमुळे साईने या शिबिरात दाखल होणाऱया सर्व म्हणजे 26 बॅडमिंटनपटूंना एक आठवडय़ाच्या कालावधीकरिता क्वारंटाईन सक्तीचे केले होते. पण ही योजना बॅडमिंटनपटू आणि अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेने फेटाळून लावली. आता हे सराव शिबीर रद्द करण्यात आल्याने बॅडमिंटनपटूंनी प्रयाण करण्यापूर्वी हैदराबादमध्ये दाखल व्हावे, अशी सूचना करण्यात आली असल्याचे निवड समिती सदस्य विमल कुमार यांनी सांगितले.