सातारा : हरियाणा येथील दिल्ली पब्लिक स्कूल, सोनिपत येथे झालेल्या ४ थ्या राष्ट्रीय ज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा बॉक्सिंग अकॅडमीच्या सृष्टी सुनीलकुमार रासकर हिने कांस्य पदकाची कामगिरी केली. 54-57 किलो वजनगटात महाराष्ट्र संघाकडून खेळताना हरियाणा विरुद्धच्या अटीतटीच्या उपांत्य सामन्यात तिने चमकदार कामगिरी केली. कांस्य पदकामुळे तिची ज्युनिअर एशियन चॅम्पियनशीप सराव शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे.
सृष्टीला आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक सागर जगताप, प्रशिक्षक विनोद राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, जिल्हा संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच सातारा बॉक्सिंग अकॅडमीचे अध्यक्ष हरिष शेट्टी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.