नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
राष्ट्रीय महिला काँग्रेस अध्यक्षपदाचा सुष्मिता देव यांनी राजीनाना दिल्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे रिक्त जागेवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नेट्टा डिसूजा यांची नियुक्ती केली आहे. सुष्मिता देव यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केल्यामुळे हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रीय महिला काँग्रेसकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. नेट्टा डिसूजा यांच्याकडे राष्ट्रीय महिला काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून पुढील आदेशापर्यंत त्या काम करत राहतील असे प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
काँग्रेसच्या नेतृत्वाशी कोणतीही नाराजी नाही आहे. काँग्रेससोबत ३० वर्षांचा राजकीय प्रवास केला. काँग्रेसकडून अनेकवेळा संधी देण्यात आली आहे. काँग्रेसने काम करण्याची संधी दिली परंतू काही कामात काही चूका झाल्या असल्यास सोनिया गांधी माफ करतील, अशी प्रतिक्रिया सुष्मिता देव यांनी दिली आहे.