वार्ताहर / बेडकिहाळ :
येथील लठ्ठे शिक्षण संस्थेच्या श्रीमती कुसुमावती मिर्जी कला व वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थी परिषद, एनसीसी व एनएसएस विभागाच्यावतीने राष्ट्रीय युवजन सप्ताह 2020 ची सांगता करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. किरण चौगुले तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुनील पाटील, जयकुमार खोत, प्राचार्य आर. बी. साबण्णावर हे उपस्थित होते.
स्वागत स्नेहा कांबळे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय प्रा. मल्लिका चरण यांनी करून दिला. स्वाती निपाणे यांनी बराडी वाचन केले. डॉ. सुनील पाटील म्हणाले, देश सेवेसाठी युवकांचे योगदान बहुमोलाचे आहे. स्वामी विवेकानंद यांनी घालून दिलेला आदर्श आजच्या पिढीने आत्मसात करून समाज उन्नतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. यावेळी मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. या सप्ताह काळात 6 रोजी उद्घाटन, जागृतीपर रॅली, नाटक, मतदार नोंदणी प्रारंभपासून ते चर्चा, भाषण स्पर्धा, स्वच्छ भारत अभियान रॅली आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्राचार्य व्ही. आर. जोर, एनएसएस अधिकारी प्रवीण देसाई, एनसीसी अधिकारी बसवराज इटनाळ, डॉ. गोपाळ महामुनी, डॉ. जी. पी. सवदी, राघवेंद्र चित्रगार, एम. एस. मोकाशी, ए. जे. पाटील, ए. डी. चौगुले, आर. डी. कांबळे, प्रधान कार्यदर्शी शिवलिला गजबर, सांस्कृतिक कार्यदर्शी जिन्मती नागावे, महिला कार्यदर्शी सुजाता उमजे यांच्यासह कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुप्रिया चौगुले यांनी केले, तर आभार पूनम पाटील यांनी मानले.