वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात नव्याने सुरू झालेल्या कोरोना महामारीच्या प्रसारामुळे भोपाळमध्ये 27 ते 29 जानेवारी दरम्यान खेळविली जाणारी राष्ट्रीय युवा ऍथलेटिक्स स्पर्धा बेमुदत कालावधीसाठी लांबणीवर टाकण्यात आल्याची घोषणा अखिल भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनने मंगळवारी केली आहे.
आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धा कोरोना महामारी समस्येमुळे लांबणीवर यापूर्वी टाकण्यात आली आहे. कुवेतमध्ये 1 ते 4 मार्च दरम्यान चौथी आशियाई युवा ऍथलेटिक्स स्पर्धा घेतली जाणार होती पण आता ती कोरोना समस्येमुळे लांबणीवर टाकण्यात आली आहे.