वृत्तसंस्था/ कोईमतूर
जे.के. टायर एफएमएससीआय राष्ट्रीय रेसिंग चॅम्पियन्सशीप स्पर्धेतील रविवारी झालेल्या एफ-4 एलजीबी च्या दोन शर्यतीमध्ये भारताचा अनुभवी विष्णू प्रसादने चमकदार कामगिरी केली.
रविवारी सकाळच्या सत्रात झालेल्या पहिल्या शर्यतीत विष्णू प्रसादने विजेतेपद पटकाविलें तर त्यानंतर झालेल्या दुसऱया शर्यतीत त्याने दुसरे स्थान मिळविले. राष्ट्रीय रेसिंग स्पर्धेत एकाच दिवशी दोनवेळा विष्णू प्रसादने पोडियमवर आपली हजेरी लावली. रविवारच्या सकाळच्या सत्रात झालेल्या पहिल्या शर्यतीत एमएस स्पोर्टस् संघाचे प्रतिनिधीत्व करताना विष्णू प्रसादने पहिले स्थान पटकाविले. दुसऱया शर्यतीत सोहिल शहाने प्रथम स्थान तर विष्णू प्रसादने दुसरे स्थान मिळविले.