निसर्गावर आधारित फिल्मकरिता दुसऱया क्रमांकाचे पारितोषिक
प्रतिनिधी / बेळगाव
निसर्गाचे रक्षण आणि निसर्गाची काळजी घेण्यासाठी भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्यावतीने निसर्गावर आधारित एक मिनिटाची फिल्म तयार करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेत देशभरातील निसर्गप्रेमींनी सहभाग घेतला होता. यामध्ये बेळगावच्या युवकांनी तयार केलेल्य चित्रफितीला दुसरा क्रमांक मिळाला आहे.
सदर स्पर्धा ऑनलाईन आयोजित करण्यात आली होती. ‘माझ्या नजरेतील विज्ञान’ अशा मथळय़ाखाली दिल्ली येथील संस्थेने ही स्पर्धा आयोजित केली होती. निसर्गाचे महत्त्व आणि निसर्गाचा अभ्यास करण्यासाठी प्राधान्य देण्याकरिता संस्थेने ही स्पर्धा आयोजित केली होती. या फिल्मच्या माध्यमातून निसर्गाचे महत्त्व थोडक्मयात प्रसिद्ध करण्याची अट घालण्यात आली होती. यामध्ये बेळगावच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सोमनाथनगर हिंडलगा येथील रहिवासी असलेल्या तुषार रणजित लाड व आदित्य लाड या दोन बंधूंनी निसर्गावर आधारित एक मिनिटाची फिल्म तयार करून स्पर्धेकरिता पाठविली होती. त्यांच्या या फिल्मला दुसऱया क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल दोघांचेही अभिनंदन करण्यात येत आहे.
तुषारचे शिक्षण केएलएस शाळा व जीएसएस कॉलेजमधून पदवी संपादन केली आहे. सध्या मास्टर्स इन मरिन बायालॉजी या अभ्यासक्रमाचे शिक्षण चेन्नई येथे घेत आहे. आदित्यही केएलएस आणि जीएसएस कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहून त्याचा अभ्यास करण्यात तुषार आणि आदित्यला आवड आहे. त्यांना दुसऱया क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.