कबनूर / प्रतिनिधी
लातूर येथे झालेल्या राज्य शुटिंगबॉल निवड चाचणी स्पर्धेत कबनूर संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. 19 वर्षे वयोगट मध्ये कबनूर मधील हर्षवर्धन फरांडे, आर्यन कांबळे, आदित्य कांबळे या तीन खेळाडूंची अहमदाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय शुटिंग बॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. शुटींग बॉल स्पर्धेच्या माध्यमातून या तीन खेळाडूंनी देशपातळीपर्यंत नावलौकिक मिळविले आहे. लातूर येथे 38 वी राज्य शुटिंग बॉल निवड चाचणी स्पर्धा भरविण्यात आली होती. राज्य शूटिंग बॉल निवड चाचणी स्पर्धेत जूनियर संघातील 19 वर्षे वयोगटातील मध्ये कबनूर शूटिंग बॉल संघाने भाग घेऊन खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून प्रतिस्पर्धी संघावर मात करून द्वितीय स्थान मिळविले.
या संघातील हर्षवर्धन फरांडे, आर्यन कांबळे, आदित्य कांबळे या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल या तिघांचीही अहमदाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय शुटिंग बॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून निवड करण्यात आल्याची घोषणा केली आहे. कोल्हापूर जिल्हा शूटिंग बॉल असोसिएशनचे अध्यक्ष शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील व कोल्हापूर जिल्हा शूटिंग बार असोसिएशनचे सचिव शीलकुमार राज यांनी निवड झालेल्या खेळाडूंचा गौरव केला. कबनूर संघाला व स्पर्धेतील निवड झालेल्या तीन खेळाडूंना प्रथमेश शिरसागर ,लक्ष्मण साठे, निखिल कांबळे, महावीर फरांडे, सुमेधा नाईक, रफिक मुजावर, विशाल कांबळे, सुजल कांबळे, प्रवीण फरांडे, सर्वेश कांबळे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.