क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावच्या इंडियन कराटे गोशिन रू संघटनेच्या कराटेपटूंनी बेंगळूर येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले
आहे.
लोयला कॉलेज बेंगळूर येथे घेण्यात आलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत संपूर्ण देशातून 300 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यामध्ये 15 वर्षाखालील गटात आयान शेखने कटाजमध्ये चार सामने खेळून विजेतेपद, शुभम मानेने फायरिंगमध्ये दुसरा क्रमांक पटकाविला. 15 वर्षे वयोगटात मेहूल शहाने 5 राऊंडनंतर विजेतेपद पटकाविले. मुलींमध्ये सुचिता कुरणेने 3 राऊंड जिंकून विजेतेपद पटकाविले.
19 वर्षाखालील गटात विक्रांत सुब्रमण्यमने 5 राऊंडनंतर प्रतिस्पर्ध्याला मात करून सुवर्णपदक पटकाविले. त्याला बेळगावचा उत्कृष्ट कराटेपटू म्हणून गौरविण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कराटेमास्टर मधू पाटील, प्रसाद पाटील, आकाश पाटील यांचे मार्गदर्शन मिळत आहे.