क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
रायचूर येथील सिंधनूर येथे घेण्यात आलेल्या सहाव्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत डायनॅमिक शुटोकॉन कराडे डू, बेळगावच्या कराटेपटूंनी घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेत ऋतुराज कुंभार कटामध्ये तिसरा, कुमेतीमध्ये दुसरा, मानवी पाटीलने कटामध्ये दुसरा, कुमेतीमध्ये तिसरा, अनुष्का पाटील कटामध्ये दुसरा, कुमेतीत पहिला, गौतमी खन्नुकरने कटामध्ये दुसरा, कुमेतीमध्ये तिसरा, नितीन अलगोंडीने कटा व कुमेतीमध्ये दुसरा, प्रेम कुरंगी कटामध्ये दुसरा, कुमेतीमध्ये पहिला, दिया पाटील कटामध्ये दुसरा, कुमेती पहिला, भूमिका बडीगेरने कटामध्ये दुसरा, कुमेतीमध्ये तिसरा, पर्णिका किरजतने कटामध्ये तिसरा, कुमेतीमध्ये दुसरा, आरव पाटील कटा व कुमेतीमध्ये तिसरा, गौरव पाटीलने कटा व कुमेतीमध्ये पहिला, श्रेया चौगुलेने कटा तिसरा, कुमेती दुसरा, प्रज्वल कुरंगीने कटा पहिला, कुमेती पहिला, नव्या पाटीलने कटा व कुमेतीमध्ये तिसरा क्रमांक पटकाविला.
या विजेत्या खेळाडूंचा मल्लेश चौगुले, अशोक कोलकार, यल्लोजी पाटील, ज्योती पाटील, मीना मुतगेकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या सर्व कराटेपटूंना कराटे प्रशिक्षक शिहान पाटील, नितेश निलजकर, करण पाटील, रोशनी मुळीक, सुकन्या पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.