मध्यप्रदेश येथे 11 जानेवारीपासून स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
मध्यप्रदेश येथे 83 व्या कॅडेट व सबज्युनियर राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य टेबल टेनिस संघटनेच्या चार टेबल टेनिस पटुंची कर्नाटक राज्य टे टे संघात तर प्रशिक्षकपदी बेळगावच्या संगम बैलूर यांची निवड झाली आहे.
मध्यप्रदेश येथे अभय प्रशाला इनडोअर स्टेडियममध्ये 83 व्या सब ज्युनियर व कॅडेट राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन 11 ते 19 जानेवारी दरम्यान भरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य टेटे संघात बेळगावच्या 11 वर्षाखालील गटात तनिष्का काळभैरव, 13 वर्षाखालील गटात आयुषी गोडसे, सान्वी मांडेकर, कॅडेट व सबज्युनियर 15 वर्षाखालील गटात यांची निवड झाली आहे.
या संघाच्या प्रशिक्षकपदी संगम बैलूर टे.टे. संघटनेचे प्रमुख प्रशिक्षक संगम बैलूर यांची निवड झाली आहे. वरील निवड झालेले सर्व टेबल टेनिसपटू बेळगाव टेबल टेनिस अकादमीचे खेळाडू असून, त्यांना संगम बैलूर, मैत्रेयी बैलूर, लता गोपाळ गोडसे यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळत आहे.
मुलींच्या गटात 11 वर्षाखालील मिनी कॅडेटमध्ये तनिष्का काळभैरव बेळगाव, राषी राव बेंगळूर, सान्वी मांडेकर बेळगाव, किरा बालिगा बेंगळूर, सबज्युनियर 15 वर्षाखालील गटात निहारीका बेंगळूर, सान्वी मांडेकर, प्रनवी एच. बेंगळूर, निता अगरवाल बेंगळूर यांचा समावेश असणारा टेबल टेनिस कर्नाटकाचा संघ मध्यप्रदेशला रवाना होणार आहे.