वार्ताहर / बिबी :
आगामी काळात होवू घातलेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज स्वबळावर सर्व 64 जागा लढविणार असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
माजी पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री आमदार महादेव जानकर यांच्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद गट लढविण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. सध्या पक्षाच्या शाखा स्थापना करण्यात येत आहेत. राज्यात रासपची ताकद वाढत असून सातारा जिल्हा परिषदेत यावेळी खाते खोलणार आहे. सध्या याबाबत विविध तालुक्यात बैठका घेऊन प्रत्येक गट निहाय मोर्चेबांधणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.