प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यात कोरोनाचा वेग थांबता थांबत नाही. त्यातच कोरोना केअर सेंटरकडूनच नियमांना तिलांजली दिली जात आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रार्दुभाव वाढण्यास आणखी मदत होत आहे, असा आरोप कोविड योद्धय़ांकडून होत आहे. सातारा तालुक्यातील राहत कोरोना कोअर सेंटरकडून रस्त्यावरच जैविक कचरा टाकला जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार का असा सवाल कोविड योद्धय़ांकडून विचारला जात आहे.
सातारा शहराबरोबर जिह्यात कोरोनाचा प्रार्दूभाव वाढत आहे. संसर्ग होण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. अशातच कोविड सेंटरमध्ये नियम पाळले जात नाही. कोविड सेंटरमध्ये दररोज तयार होणाऱया कचऱयाची विल्हेवाट हे वैद्यकीय निकषानुसारच लावली गेली पाहिजे. जेणेकरुन त्या कचऱयाची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली गेली तर कोरोनाचा प्रार्दभाव वाढणार नाही. मात्र, साताऱयातल्या काही कोविड सेंटरमध्ये तयार होणारा कचरा हा उघडय़ावर टाकण्यात येतो. असाच प्रकार साताऱयापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या लिंब खिंडीतील राहत या कोरोना केअर सेंटरमध्ये तयार होणारा जैविक कचरा हा तेथेच एका खड्डय़ात टाकला जातो. उघडय़ावर टाकलेल्या कचऱयावर भटकी कुत्री असतात. ती कुत्री अस्ताव्यस्त कचरा नेतात. त्याच कचऱयातून व कुत्र्यांच्या माध्यमातून कोरोनाचा स्प्रेड वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे राहत कोरोना केअर सेंटरमधून जो जैविक कचरा उघडय़ावर टाकला जात आहे. त्याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
कारवाई होणार कधी
लोकांच्या जिविताशी खेळण्याचा प्रकार राहत कोरोना सेंटरमधून होत आहे. जैविक कचरा रस्त्यावर टाकता येत नाही. असा कचरा रस्त्यावर टाकणाऱयावर कारवाई केली जाते. तो नियमबाह्य आहे. साताऱयातील जैविक कचरा नष्ट करण्यासाठी नेचर नीड या संस्थेकडे काम आहे. मात्र, राहतकडून जैविक कचऱयाचे नष्ट करण्याचे काम होत नाही. उघडय़ावर कचरा टाकून तो जाळला जात आहे. चौकशी करुन कारवाई केली जात आहे.