पुस्तकात केलेल्या टिप्पणीमुळे काँगेस नेते संतप्त
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
काँगेस नेते राहुल गांधी यांच्यासंबंधी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या येऊ घातलेल्या पुस्तकात केलेल्या टिप्पणीमुळे काँगेस नेत्यांचा संताप झाला आहे. या पुस्तकात ओबामा यांनी राहुल गांधी ‘अकार्यक्षम’ असल्याची टिप्पणी केली आहे. हे पुस्तक येत्या 17 नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार आहे.
‘राहुल गांधी हे उदास (नर्व्हस) आणि विस्कळीत (अनफॉर्मड्) योग्यता असणारे आहेत. त्यांची अवस्था अशा विद्यार्थ्यासारखी आहे जो गृहपाठ करून शिक्षकांवर छाप मारण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्याजवळ शिकत असलेल्या विषयात प्राविण्य मिळविण्याइतकी क्षमता किंवा महत्वाकांक्षा नाही’, असे विधान ओबामांनी आपल्या पुस्तकात केले आहे. या पुस्तकाचे नाव ‘ अ प्रॉमिस्ड लँड’ असे आहे. 768 पानांचे हे पुस्तक लवकरच बाजारात येत आहे.
या पुस्तकात ओबामा यांनी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासंबंधी अतिशय आदरयुक्त भाष्य केलेले आहे. मनमोहनसिंग यांचे व्यक्तिमत्व प्रभावी आणि प्रामाणिक आहे, असे ओबामा सांगतात. या पुस्तकात ओबामा यांनी आपल्या बालपणापासून अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा पहिला कालावधी पूर्ण करण्यापर्यंतच्या घटना मांडल्या आहेत. तसेच 2012 पर्यंतच्या कालावधीत त्यांचा ज्या जागतिक नेत्यांशी संपर्क आला त्यांच्यासंदर्भातील स्वतःची मतेही नोंदविली आहेत. या नेत्यांमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन, अमेरिकेचे भावी अध्यक्ष ज्यो बायडन इत्यादींचा समावेश आहे. हे पुस्तक एकप्रकारे ओबामांची स्मरणगाथा आहे.
काँगेस संतप्त
राहुल गांधी यांच्यावर ओबामा यांच्यासारख्या जगद्विख्यात नेत्याने अशी टिप्पणी केल्याने काँगेस नेते प्रचंड संतापले आहेत. राहुल गांधी यांनी स्वतः अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. तथापि अन्य काँगेस नेत्यांनी ओबामा यांच्यावर तोंडसुख घेतले.
ओबामा हे राहुल गांधी यांना आठ ते दहा वर्षांपूर्वी अगदी थोडावेळ भेटले असतील. ते ज्यावेळी 2010 मध्ये भारताच्या दौऱयावर आले होते, त्यावेळी ही भेट झाली असेल. एवढय़ा अल्प कालावधीच्या भेटीनंतर राहुल गांधी यांच्यासंबंधी अशी मते व्यक्त करणे योग्य नाही. इतक्या कमी कालावधीत एखाद्या व्यक्तीचे अंतरंग ओळखता येणे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया काँगेस नेते तारिक अन्वर यांनी व्यक्त केली. अन्य काही काँगेस नेत्यांनीही संताप व्यक्त केला आहे. काँगेसच्या मित्रपक्षांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. समाजमाध्यमांवर गांधीची खिल्ली उडविण्यात येत
ओह.
भाजपकडून शरसंधान
ओबामा यांच्या पुस्तकातील टिप्पणी प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपनेही काँगेस व राहुल गांधींवर टीका केली. गांधी यांची क्षमता जगजाहीर झाली आहे. अशा परिस्थितीत काँगेसने केलेला त्यांचा बचाव लंगडा आहे. राहुल गांधींची आंतरराष्ट्रीय प्रतिमा कशी आहे, आहे हे ओबामा यांच्या टिप्पणीवरून समजून येते अशा प्रतिक्रिया समाज माध्यमांवरही आता उमटू लागल्या आहेत.