नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पंजाबमध्ये 3 जानेवारी रोजी होणारी जाहीर सभा रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधी हे मोगा येथील प्रचारसभेला संबोधित करणार होते. पक्षाचा 137 वा स्थापना दिन साजरा केल्यावर राहुल हे इटलीला रवाना झाले आहेत. इटलीत ते खासगी दौऱयावर गेल्याचे सांगण्यात येत आहे. राहुल गांधी सध्या इटलीच्या दौऱयावर आहेत. राहुल हे संक्षिप्त खासगी दौऱयावर आहेत. भाजपने यासंबंधी अनावश्यक स्वरुपात अफवा फैलावू नयेत. राहुल गांधी हे 5 जानेवारी रोजी भारतात येतील, ते सर्वांच्या संपर्कात असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या इटली दौऱयापूर्वी मोगामध्ये 3 जानेवारी रोजी सभा प्रस्तावित होती. पण तत्पूर्वीच पक्षाचा स्थापना दिन साजरा करून राहुल हे विदेशात पोहोचले आहेत.
Previous Articleभाजपचा आढावा तर येडिंचा दुरावा
Next Article सर्वात घातक रणगाड्य़ाची भारतात निर्मिती?
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.