ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट आठवडय़ाभरानंतर अखेर सुरू करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्यासहित काँग्रेसच्या इतर नेत्यांचेही ट्विटर अकाऊंट अनलॉक करण्यात आली आहेत.
दिल्लील बलात्कार करुन हत्या झालेल्या नऊ वर्षाच्या पीडितेच्या कुटुंबाचे फोटो ट्विट केल्यानंतर ट्वटिरने अकाऊंट बंद करत ही कारवाई केली होती. राहुल गांधी यांनी शुक्रवारी ट्विटरवर जोरदार टीका करताना देशाच्या राजकारणात हस्तक्षेप करत असल्याची टीका केली होती. त्यानंतर लगेचच ट्विटरकडून कारवाई मागे घेण्यात आली आहे.
ट्विटरने बलात्कार पीडितेच्या कुटुंबाचे फोटो शेअर करणे म्हणजे नियमांचे उल्लंघन असल्याचे म्हटले होते. याला उत्तर देताना राहुल गांधी यांनी देशाच्या राजकारणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न ट्विटर करत आहे. हा देशाच्या लोकशाही रचनेवर हल्ला असल्याचा आरोप केला होता. माझे ट्विटर अकाऊंट ब्लॉक केले हे फक्त माझा आवज बंद करण्यापूरते नाही तर लाखो आणि करोडो लोकांना गप्प करण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी म्हटले होते.
दरम्यान, इन्स्टाग्रामवरूनही काँग्रेस नेते राहुल गांधी यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने केली आहे. त्यांनी फेसबुकला कळवले आहे की, राहुल यांच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलमध्ये एका कुटुंबाचे छायाचित्र असून त्यात बलात्कारपीडित व हत्या झालेल्या मुलीचा समावेश आहे.