जबलपूर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असणाऱया मुस्लीम राष्ट्रीय मंच या संस्थेने अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या निर्मितीसाठी मध्य प्रदेशात निधी संकलनास प्रारंभ केला आहे. या मंचाचे राष्ट्रीय समन्वयक एस. के. मुदिन यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. प्रभू रामचंद्र हे सर्व भारताचे आदरस्थान आहेत. त्यामुळे मुस्लिमांनीही निधी संकलनात मोठय़ा प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
सर्व भारतीय एकाच कुटुंबाचे सदस्य आहेत. भारतातील मुसलमान हे याच मातीतील असून ते येथे अरबस्तानाहून आलेले नाहीत. तसेच येथील ख्रिश्चनही रोमहून आलेले नाहीत. भारतातील विविध समाज घटकांची पूजा पद्धती भिन्न असू शकेल, पण आपले पूर्वज एकच आहेत, याची जाणीव सर्वांनी ठेवणे आवश्यक आहे, असे मुदिन यांच्या वक्तव्यात म्हटले आहे.
पवन कल्याण यांची 30 लाखांची देणगी
आंध्र प्रदेशातील जनसेना पक्षाचे प्रमुख आणि तेलगू चित्रपट अभिनेते के. पवन कल्याण यांनी अयोध्येतील राम मंदिरासाठी 30 लाख रुपयांची देणगी दिली, असे या पक्षाने घोषित केले.