वृत्तसंस्था/ माद्रिद
स्पॅनिश ला लिगा क्लबस्तरीय फुटबॉल स्पर्धेत गुणतक्त्यात दुसऱया स्थानावर असलेल्या रिअल माद्रिद फुटबॉल क्लबचे प्रमुख प्रशिक्षक फ्रान्सचे झिनेदिन झिदान हे कोरोनाबाधित असल्याची माहिती या क्लबच्या वरि÷ अधिकाऱयांनी दिली आहे.
या स्पर्धेच्या गुणतक्त्यात रिअल माद्रिद दुसऱया स्थानावर आहे तर ऍटलेटिको माद्रिद पहिल्या स्थानावर असून या दोन संघांमध्ये 7 गुणांचा फरक आहे. शनिवारी रिअल माद्रिदचा सामना अल्व्हेसबरोबर होणार आहे. प्रशिक्षक झिदान हे कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना आता काही दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे. झिदान यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले.