वृत्तसंस्था/ रिओ डे जेनेरिओ
येथे सुरू असलेल्या एटीपी टूरवरील 500 दर्जाच्या रिओ डे जेनेरिओ या पुरूषांच्या ब्राझिलियन स्पर्धेतून अर्जेंटिनाचा माजी टॉप सीडेड मार्टिन डेल पोट्रोने माघार घेतल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली आहे.
या स्पर्धेत पोट्रोला पुरूष एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये वाईल्डकार्डद्वारे प्रवेश देण्यात आला होता. अर्जेंटिनाच्या पोट्रोने लवकरच टेनिस क्षेत्रातून निवृत्त होण्याचे संकेत यापूर्वीच दिले होते. आता निवृत्तीबाबत आपण काही व्यक्तींशी चर्चा करणार असल्याचे पोट्रोने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. या स्पर्धेत पोट्रोला पहिल्याच फेरीतील सामन्यात आपल्याच देशाच्या डेल्बोनिसकडून 6-1, 6-3 असा पराभव पत्करावा लागला होता. 2019 नंतर प्रथमच पोट़ोने या स्पर्धेत पुनरागमन केले होते. त्याने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत 2009 साली अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतील जेतेपद आणि एटीपी टूरवरील 22 स्पर्धा जिंकल्या आहेत.