प्रतिनिधी/ सातारा
जिह्यातील बाधित वाढ मंगळवारी काहीशी कमी झाली आहे. तर कोरोनामुक्ती वाढली गेल्याने रिकव्हरी रेट 94.01 वर पोहचला गेल्याने जिह्यासाठी दिलासादायक बाब ठरली आहे. जिह्यात 8747 सक्रिय रुग्ण असून त्यापैकी केवळ 424 जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. जिह्यातील 45 जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱयांनी कोरोना मुक्ती दिली आहे.
केवळ हॉस्पिटलमध्ये 424 जण
हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱयाची संख्या केवळ 424 एवढी आहे. त्यापैकी 16 जणांची प्रकृती गंभीर आहे. जिह्यात 8747 जण सक्रिय रुग्ण आहेत. एकूणच रिकव्हरी रेट 94.01 वर पोहचला असल्याने जिह्यासाठी दिलासादायक बाब आहे.
जिह्यात 1921 जणांची कोरोनामुक्ती
नव्याने जिह्यात 921 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या 270565 वर पोहचली आहे. कोरोना मुक्तीचा आकडा वाढला आहे. मंगळवारी दिवसभरात 1921 जण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 254354 बाधित झाले आहेत.
सातारा जिल्हा परिषदेच्या 45 कर्मचाऱयांची कोरोना मुक्ती
जिल्हा परिषदेच्या जिह्यातील 15 डिसेंबर नंतर 281 जण कोरोना बाधित झाले होते त्यापैकी 45 जण कोरोनामुक्त झाले आहे. 236 रुग्ण सक्रिय आहेत. कराड तालुक्यातील 34 रुग्ण सक्रिय तर 2 जणांची कोरोनामुक्ती, कोरेगाव तालुक्यातील 12 रुग्ण सक्रिय तर 2 जणांची कोरोना मुक्ती, खंडाळा तालुक्यातील 24 जण सक्रिय तर 3 जण कोरोना मुक्त, खटाव तालुक्यातील 15 जण सक्रिय तर 1 ची कोरोना मुक्ती, जावली तालुक्यातील 3 जण सक्रिय तर 1 ची कोरोना मुक्ती, पाटण तालुक्यातील 33 जण सक्रिय तर 6 जणाची कोरोना मुक्ती, फलटण तालुक्यातील 32 जण सक्रिय तर 5 जणांची कोरोना मुक्ती, महाबळेश्वर तालुक्यातील 6 जण सक्रिय तर 6 जण कोरोना मुक्त, माण तालुक्यातील 17 जण सक्रिय तर 4 जण कोरोना मुक्त, वाई तालुक्यातील 36 जण सक्रिय तर 14 जण कोरोना मुक्त, सातारा तालुक्यातील 24 जण सक्रिय तर 1 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
महाबळेश्वर तालुक्यातील सर्वात कमी नव्याने बाधित
नव्यानं बाधित आढळून आलेल्यामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील केवळ तीन जण बाधित आढळून आले आहेत. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे कंसात मृत्यू ः जावली 11(0), कराड 281(2), खंडाळा 41(0), खटाव 48(1), कोरेगाव 47(2), माण 36(0), महाबळेश्वर 3(0), पाटण 25(0), फलटण 117(0), सातारा 221(2), वाई 44(0), इतर 35(0), एकूण 909(8).
ङआतापर्यंत बाधित व मृत्यू तालुकानिहायङ
जावली 10505(226), कराड 42748(1260), खंडाळा 15,354(198), खटाव 27086(665), कोरेगाव 22968(523), माण 18,732(428), महाबळेश्वर 5271(90), पाटण10923(384), फलटण 39445(707), सातारा 57786(1563), वाई 17024(406), इतर 2772(96), एकूण 270614(6546).