खडेबाजार पोलिसांकडून अटक, रिक्षा जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
संचारबंदी असो किंवा कोरोना थोपविण्यासाठीचा लॉकडाऊन असो, आपल्या वाहनांवर प्रेस असे लिहून फिरणाऱयांची संख्या मोठी असते. बुधवारी बेळगाव पोलिसांनी केलेल्या तपासणीत रिक्षाचालकाकडे पत्रकार असल्याचे ओळखपत्र आढळून आले आहे.
खडेबाजार पोलिसांनी उल्हास बसवराज आदवानी (वय 26, रा. टीचर्स कॉलनी-हिंडलगा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. खडेबाजारचे पोलीस निरीक्षक धीरज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आर. बी. सौदागर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
एका कन्नड साप्ताहिकाचे मुदत संपलेले ओळखपत्र, ऑटोरिक्षा जप्त करण्यात आली असून रिक्षा चालकाविरुद्ध खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुदत संपलेले ओळखपत्र दाखवत कोविड-19 नियमावलीचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून ही कारवाई केली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी दिली.