प्रतिनिधी / कोल्हापूर
महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवारी रिक्षा सौंदर्य स्पर्धा पार पडल्या.या स्पर्धेत नवीन गटातून राजू खतीब यांच्या एम.एच.09-ईएल-0035 या रिक्षाला प्रथम क्रमांक मिळाला.तर जुन्या गटातून बेळगावच्या सादिक पिरजादे यांच्या के.ए.22-बी-7528 या रिक्षाला प्रथम क्रमांक मिळाला.
शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात या स्पर्धा पार पडल्या.स्पर्धेत कोल्हापूर,बेळगाव, कराडमधील रिक्षाचालकांनी सहभाग घेतला होता.सकाळी प्रताप देसाई,गणेश देवणे,विजय गायकवाड,चंद्रकांत भोसले यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. एकापेक्षा एक सजावट केलेल्या रिक्षांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.सजावटीसह प्रवाशांना रिक्षात देण्यात येणाऱया सुविधांची पाहणी यावेळी करण्यात आली.यावेळी सहभागी रिक्षांचे रॅम्प वॉक झाले.या वॉकला शिटृय़ा आणि टाळयांच्या गजरात प्रतिसाद मिळाला. स्पर्धेसाठी नवीन आणि जुन्या रिक्षा असे दोन गट तयार करण्यात आले होते.
सायंकाळी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.नवीन गटात राजू खतीब यांच्या रिक्षाला प्रथम क्रमांक मिळाला.तर जुन्या गटातबेळगावच्या सादिक पिरजादे यांच्या के.ए.22-बी-7528 या रिक्षाला प्रथम क्रमांक मिळाला. आमदार चंद्रकांत जाधव,पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव,शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे,शिवसेना शहरप्रमुख सुजित चव्हाण यांच्या हस्ते बक्षीस वितरण पार पडला.यावेळी इम्रान जमादार,प्रसाद तोरस्कर,संभाजी रणदिवे,सुधीर पाटील,विजय सावंत,सर्जेराव गौड या प्रामाणिक रिक्षा चालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण विलास गवळी,मनोज दरेकर,मुकुंद श्रीखंडे यांनी केले.सूत्रसंचालन भालचंद्र काणे यांनी केले.
जुना गट
व्दितीय क्रमांक -मुस्ताक अहमद पठाण-बेळगाव
तृतीय क्रमांक – मोहन लाड,पंढरपूर
उत्तेजनार्थ -सागर शिंदे,कराड
जुना गट
व्दितीय क्रमांक -शिवानंद वरुटे,कोल्हापूर
तृतीय क्रमांक -युसुफ पिरजादे,बेळगाव
उतेजनार्थ -संतोष बाळू,बेळगाव