महागाई नियंत्रणावर लक्ष केंद्रीत करण्याचे संकेत ः 6 ते 8 एप्रिल दरम्यान बैठकीचे आयोजन
नवी दिल्ली
भारतीय रिझर्व्ह बँकच्या (आरबीआय) द्वीमासिक पतधोरण बैठकीला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. सदरची बैठक ही 6 एप्रिल ते 8 एप्रिल या दरम्यान होणार आहे. यामध्ये व्याजदरात कोणत्याही प्रकारचा बदल होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र महागाईचा उठालेला आगडेंब नियंत्रणात आणण्यासह अन्य मुद्यांवर चर्चेसह निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रेपोदर एप्रिल 2001 पासून सर्वात निच्चांकी पातळीवर आहे. मागील फेब्रुवारीच्या बैठक झाली होती. तेव्हा आरबीआयने चालू आर्थिक वर्षात 2021-22 साठी जीडीपी वाढीचा अंदाज 9.5 टक्के कायम राहणार असल्याचे निश्चित केले होते. मात्र अभ्यासकांच्या मते अर्थव्यवस्थेमधील सुधारणात्मक स्थितीमुळे आरबीआय सध्या व्याजदरांमध्ये बदल करण्याची शक्यता कमी आहे.
निर्णयांची अंतिम घोषणा 8 एप्रिल रोजी
आरबीआयच्या बैठकीत विविध विषयांवरील चर्चेच्या निर्णयांची घोषणा ही येत्या 8 एप्रिल रोजी बैठकीच्या अंतिम दिवशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
सध्या रेपोदर 4 टक्के आणि रिव्हर्स रेपोदर 3.35 टक्के आहे. आरबीआयने मागील दहाव्यांदा हा रेपोदरात कोणताही बदल केलेला नाही. मे 2020 पासून हा दर जैसे थेच आहे.