ऑनलाईन टीम / मुंबई :
रिझर्व्ह बँकेने डेप्युटी गव्हर्नर पदी मायकेल पात्रा यांची नियुक्ती केली आहे. मायकेल पात्रा हे सध्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण विभागात काम करतात.
विद्यमान डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या जागी मायकेल पात्रा यांची नियुक्ती करण्यात आहे. मायकेल 23 जुलै रोजी पदभार स्विकारणार आहेत.
पात्रा हे 1985 मध्ये रिझर्व्ह बँकेत रुजू झाले. रिझर्व्ह बँकेच्या विविध विभागात 35 वर्ष काम केल्याचा त्यांचा अनुभव आहे. वित्त आणि आर्थिक धोरणांचा त्यांचा गाढा आभ्यास आहे. ते आर्थिक विश्लेषण आणि धोरण विभागाचे सल्लागारही होते. 2005 पासून ते पतधोरण विभागात काम करतात. पात्रा यांनी अर्थशास्त्रात पीएचडी केलेली आहे. तसेच हावर्ड विद्यापीठात आर्थिक स्थैर्य या विषयावर त्यांनी संशोधनात्मक लिखाण केले आहे.