नवी दिल्ली –
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक बुधवार 4 ऑगस्टपासून सुरू होणार असून सदरच्या बैठकीत रेपो रेटबाबत चर्चा केली जाणर आहे. रेपो दरात कपात केली जाणार नसल्याचे संकेत तज्ञांकडून मिळाले आहेत.
सदरची बैठक 4 ऑगस्टला सुरू होणार असून 6 ऑगस्टला रेपो दराबाबतचा निर्णय जाहीर केला जाणार आहे. तज्ञांच्या मते सदरच्या बैठकीत रेपो रेट जैसे थे ठेवला जाईल. पण दुसरीकडे रिव्हर्स रेपो दरात वाढ करण्याबाबत निर्णय होऊ शकतो, असेही काही तज्ञांनी मत व्यक्त केले आहे. सध्याला रेपो रेट 4.0 टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्के इतका आहे. वाढती महागाई व एकंदर परिस्थितीचा विचार करता रेपो दरात वाढ करण्यात येणार नसल्याचे बोलले जात आहे.