मुंबई
सध्याची एकंदर परिस्थिती पाहता भारतीय रिझर्व्ह बँक येत्या आठवडय़ात होणाऱया द्वैमासिक पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो रेट जैसे थे ठेवणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सदरच्या समितीची बैठक 6 एप्रिलला सुरू होणार असून 8 एप्रिलला संपणार आहे. व्याजदर वाढीबाबतचा निर्णय 8 एप्रिलला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास हे समिती सदस्यांसोबतच्या सविस्तर चर्चेनंतर जाहीर करणार आहेत. वाढती किरकोळ महागाई, रशिया युक्रेन युद्ध या पार्श्वभूमीवर व्याजदर वाढवले जाणार नाहीत, असे तज्ञ सांगत आहेत.