रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांची माहिती -नोव्हेंबरमधली स्थिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशाच्या जीडीपीमध्ये 10 टक्केपेक्षा अधिक आणि एकूण रोजगारात 8 टक्केपेक्षा अधिकची हिस्सेदारी ठेवणाऱया रिटेल क्षेत्राची विक्री ही मागील दोन महिन्यात कोविडपूर्वपेक्षा अधिक राहिली आहे, अशी माहिती रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनी दिली आहे.
नोव्हेंबरमध्ये रिटेल विक्री ही नोव्हेंबर 2019 पेक्षा 6 टक्के अधिक राहिली आहे. तर 2020 च्या तुलनेत ही वाढ 16 टक्के अधिक आहे. साधारणपणे चालू ऑक्टोबरच्या तुलनेत रिटेल क्षेत्राची विक्री ही जवळपास 5 टक्क्यांनी घसरली असल्याची माहिती आहे.
कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्सची विक्री नोव्हेंबरमध्ये चांगली राहिली असून जी ऑक्टोबरमध्ये बऱयापैकी राहिली नव्हती. यासोबतच देशातील खेळासह अन्य क्षेत्रांना मिळत गेलेल्या दिलाशामुळे पुन्हा स्पोर्ट्स गुड्सची विक्री 2019 च्या तुलनेत 18 टक्के अधिक राहिली आहे.
देशाच्या पश्चिम हिस्सेदारीत रिटेल विक्रीत सर्वाधिक कामगिरी राहिली आहे, ज्यामध्ये कोविडपूर्व पातळीवर म्हणजे 11 टक्के आणि वर्षाच्या आधारे 21 टक्के वाढ होणार असल्याचे संकेत आहेत. पूर्व व दक्षिण भारतामध्ये रिटेल विक्री कोविडपूर्व पातळीच्या 9 टक्के अधिक राहिली होती, जी वर्षाच्या आधारे क्रमशः20 आणि 11 टक्के आधिक राहिलीय, असे स्पष्टीकरण रिटेलर्स असोसिएशने दिले आहे.