वृत्तसंस्था/ सिंगापूर
भारताची महिला मल्ल रितू फोगटने मिक्सड मार्शल आर्ट (एमएमए) क्षेत्रात आपली अपराजीत मालिका कायम राखली आहे. सिंगापूरमध्ये झालेल्या लढतीत 26 वर्षीय रितू फोगटने फिलिपिन्सच्या जोमेरी टोरेसचा पहिल्याच फेरीत तांत्रिक गुणावर पराभव करत जेतेपद पटकाविले.
सिंगापूरमधील इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या या लढतीमध्ये रितू फोगटने टोरेसचा पराभव केला. 2020 च्या कालावधीतील रितूचे हे सलग तिसरे विजेतेपद आहे. आतापर्यंत तिने एमएमए प्रकारात सलग चार लढती जिंकल्या आहेत. आता महिलांच्या ऍटोमवेट ग्रा प्रि स्पर्धेत अव्वल स्थान मिळविण्यासाठी माझे यापुढे प्रयत्न राहतील, असे रितू फोगटने सांगितले.