सातारा / प्रतिनिधी :
साताऱ्यातील मेडिकल कॉलेजला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, पुरवठा विभागाकडून रेशन पुरवणाऱ्या वाहनांना जीपीआरएस प्रणाली बसवण्यात यावी, कराडमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारावा, यासह अन्य मागण्यांसाठी रिपाइंच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली.
रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कामगार युनियनचे अध्यक्ष मदन खंकाळ, युवक उपाध्यक्ष सोमनाथ धोत्रे, दीपक गाडे, रामभाऊ मदाळे, शहराध्यक्ष जयवंत कांबळे आदी उपस्थित होते.