वृत्तसंस्था / सिडनी
येथे सुरू असलेल्या सिडनी खुल्या महिला टेनिस स्पर्धेत कझाकस्तानच्या इलिना रिबेकिनाने ब्रिटनच्या अमेरिकन ग्रॅण्डस्लॅम विजेत्या इमा रॅडुकानूचा पराभव केला. दुसऱया एका सामन्यात बेनसिकने ब्राझीलच्या माईयाचा पराभव करत विजयी सलामी दिली.
रिबेकिनाने रॅडुकानूचा 6-0, 6-1, ऑलिंपिक विजेती बेनसिकने ब्राझीलच्या माईयाचा 6-3, 6-2, ऑस्ट्रेलियाचा टोमालेजोनोव्हिकने स्लोव्हेकियाच्या स्किमेडीलोव्हाचा 6-2, 6-3 असा पराभव करत पुढील फेरी गाठली.
सिडनीमध्ये सुरू असलेल्या पुरूषांच्या एटीपी 250 दर्जाच्या स्पर्धेत अमेरिकेच्या कुडलाने डेलबोनिसचा 6-3, 6-1, नेकासिमाने झेकच्या व्हॅसेलीचा 7-6 (7-2), 7-6 (7-0) असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश मिळविला.