यशराज फिल्सकडून मिळाली संधी
अभिनेत्री रिमी सेन मोठय़ा पडद्यावरून गायब झाल्यावर आता यशराज फिल्म्सद्वारे धमाकेदार पुनरागमन करणार आहे. रिमी सेन एका म्युझिक व्हिडिओत दिसून येणार असून याचे दिग्दर्शन प्रेरणा अरोडा यांनी केले आहे. याचे चित्रिकरण 12 एप्रिलपासून सुरू होणार आहे. रिमीने स्वतःच्या कारकीर्दीत ‘धूम’ सारखा यशस्वी चित्रपट केला होता, परंतु त्यानंतर ती जणू गायब झाली होती.
काही काळानंतर बिग बॉस सारख्या रियलिटी शोमध्ये ती दिसून आली होती. परंतु ती आता पुन्हा बॉलिवूडमध्ये जम बसवू पाहत आहे. चित्रपटसृष्टीपासून मी दूर होते हे सर्वजण जाणतात. मी अनेक गोष्टींमध्ये नशीब आजमाविले, वेगवेगळय़ा प्रकारचे चित्रपट केले, परंतु मला या कामाकरता समाधान वाटले नाही. पैशांसाठी मी कधीच चित्रपट करत नव्हते. स्वतःच्या क्रिएटिव्ह आनंदासाठी काम करणे हेच माझे उद्दिष्ट होते. कारकीर्दीच्या प्रारंभी मोठमोठे बॅनर, मोठय़ा कलाकारांसोबत काम केले होते, तेव्हा माझ्या व्यक्तिरेखेवर कधीच लक्ष दिले नव्हते हीच माझी चूक ठरल्याचे रिमीने म्हटले आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करण्याची माझी तयारीत आहे. बुद्धिया सिंह डोंट रन हा चित्रपट मी तयार केला होता, ज्याला 2015 मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आता मी वेळ काढून वेबसीरिजवर काम करत असल्याचे तिने म्हटले आहे.