रियलमी आपले स्थान मजबूत करण्याच्या तयारीतः 22 एप्रिलला फोन दाखल होणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रियलमी भारतीय बाजारात मागील काही दिवसांपासून तेजीने कामगिरी करत असून आपले स्थान मजबूत करण्याची तयारी कंपनी करत असल्याचे दिसून येत आहे. 2020 च्या अखेरपर्यंतच्या तिमाहीत कंपनीचे समभाग 15 टक्क्यांपेक्षा अधिकने मजबूत राहिले आहेत. यासोबतच पहिल्या पाच कंपन्यांमध्ये रियलमीने चौथे स्थान प्राप्त केले आहे.
सदर वातावरणामध्ये सध्या कंपनी स्वस्त 5 जी स्मार्टफोन भारतीय बाजारात येत्या 22 एप्रिल रोजी सादर करण्याचे संकेत आहेत. ‘रियलमी 8’ 5जी स्मार्टफोन हे मॉडेल सादर करणार असून याचा टीजर फ्लिपकार्टवर सादर झालेला आहे.
मीडियाटेकची नवी चिपसेट
रियलमी 8 5 जी मधील स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकच्या नवीन डायमेंसिटी 700 5 जी चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. कंपनीने याला भारतीय बाजारात सादर करण्यासाठी विशेष पातळीवर डिझाईन केले आहे. साधारणपणे याची किमत ही कमीत कमी ठेवण्यात येणार असून ती 20,000 रुपयांपर्यंत राहणार असून ती भारतीय ग्राहकांना परवडणारी असल्याचेही यावेळी कंपनीने स्पष्ट केले आहे.
सॅमसंगही स्वस्त 5 जी आणण्याच्या तयारीत सॅमसंग भारतीय बाजरामध्ये मध्यम सेगमेंटचा पहिला 5 जी स्मार्टफोन ‘गॅलेक्सी एम42’ ला सादर करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये सदरचा स्मार्टफोनही याच महिन्यात भारतीय बाजारात दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.