12 दिवसांपर्यंत मिळणार बॅकअप – 3,499 रुपयांपर्यंत किमत
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
रियलमीचे डिजो वॉच भारतात सादर करण्यात आले आहे. सदरच्या डिजोचे पहिले स्मार्टवॉच म्हणून ओळख राहणार आहे. कंपनीने दावा केला आहे, की वॉच एकदा चार्ज केल्यानंतर 12 दिवसांपर्यंत बॅटरीचा बॅकअप मिळणार आहे. स्मार्टवॉचमध्ये धूळ आणि पाणी यापासून बचाव करण्यासाठी आयपी68 रेटेड फिचर मिळणार आहे.
भारतामध्ये रियलमी डिजो वॉचची किमत ही 3,499 रुपयापर्यंत राहणार आहे. 2,999 रुपयांना खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. वॉचची विक्री 6 ऑगस्टच्या दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होणार आहे. ग्राहकांना कार्बन ग्रे आणि सिल्वर कलरमध्ये वॉच खरेदी करता येणार आहे.
रियलमी डिजो वॉचमध्ये 1.4 इंच पिक्सल टीएफटी डिस्प्ले असून यामध्ये 600 निट्स पीक ब्राइटनेस आणि 323 पीपीआय पिक्सल डेंसिटी आहे. रियल टाईम हार्टरेट मॉनिटरिंगसाठी पीपीजी सेंसर आहे.
90 स्पोर्ट्स मोड
ऍक्टिव्हिटी ट्रकिंगच्या दरम्यान रियलमी डिजो वॉचमध्ये 90 स्पोर्ट्स मोड आहे. ज्यामध्ये घराच्या आतमध्ये व बाहेर अशा दोन्ही ठिकाणी धावणे, चालणे आणि सायकल चालविणे आणि योगा यासारख्या सर्व प्रकारच्या व्यायाम प्रकाराच्या नोंदी सदरच्या स्मार्टवॉचमध्ये नियमीतपणे ठेवता येणार असल्याचे समजते.