15 हजार ते 18 हजारच्या घरात किंमती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय बाजारात बजेटमधील स्मार्टफोन सादर करणारी लोकप्रिय कंपनी म्हणून ओळख असणाऱया रियलमी कंपनीने आपली 8 आवृती सादर केली आहे. सदर आवृत्तीमध्ये दोन स्मार्टफोन सादर केले असून यामध्ये रियलमी 8 आणि 8 प्रो यांचा समावेश आहे. मागील वर्षी 7 आवृत्ती सादर करण्यात कंपनीला यश मिळाले होते.
विशेष सुविधा व किमती
कंपनी लवकरच पिवळय़ा रंगाचे मॉडेल सादर करणार आहे. रियलमी 8 मध्ये 4 जीबी व 128 जीबी क्षमता असून याची किमत 14,999 रुपये आहे.
6 जीबी व 128 जीबी क्षमतेच्या स्मार्टफोनची किमत 15,999 रुपये राहणार आहे. त्याच्या वरचे मॉडेल 16,999 रुपयांना उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.
रियलमी 8 प्रोच्या 6 जीबी व 128 जीबी क्षमतेच्या फोनची किमत 17,999 रुपये आहे. सदरचा स्मार्टफोन इनफिनिटी ब्लॅक आणि इनफिनिटी ब्लू रंगात खरेदी करता येणार आहे. रियलमी 8 आवृत्तीच्या स्मार्टफोनची विक्री ही 25 मार्चच्या दुपारी सुरु झाली आहे. फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या कार्यालयीन वेबसाईटवर याची खरेदी करता येणार असल्याची माहिती आहे.