भूताटकीयुक्त, हत्या झालेल्या घरांना स्टार रेटिंग
कुठल्याही जुन्या घरात जर एखादी हत्या किंवा दुर्घटना झाली असल्यास ते विकले जाणे जवळपास अशक्य आहे. जपानमध्येही अशी अनेक घरे आहेत, जेथे अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत. अशा स्थितीत या घरांची विक्री होणे बंद झाले होते. पण जोबुत्सु नावाचे एक रियल इस्टेट स्टार्टअप अनोख्या कल्पनेसह समारे आले. स्टार्टअपने अशा घरांचे स्टार रेटिंग तयार केले.
ज्या घरात हत्या झाली होती, त्याला 7 स्टारचे रेटिंग देण्यात आले. तर दुर्घटना झालेल्या घराला 6 किंवा 5 स्टारचे रेटिंग देण्यात आले. हत्या झालेल्या घरांची खरेदी करणाऱयासाठी 50 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली. हा फॉर्म्युला आता यशस्वी ठरला आहे. जपानमध्ये अशा घरांना ऍक्सिडेंट प्रॉपर्टी म्हटले जाते.
घर विकणाऱयाला तेथे एखादी हत्या किंवा दुर्घटना झाली आहे का नाही सांगणे जपानमध्ये कायदेशीरदृष्टय़ा बंधनकारक आहे. अशाप्रकारच्या ऍक्सिडेंटयुक्त घरांना खरेदी करणे टाळण्याची परंपरा जपानमध्ये आहे. स्टार्टअप जोबुत्सुने स्वतःच्या वेबसाइटवर घरांची पूर्ण यादी प्रसिद्ध केली आहे. ज्याच्या आधारावर खरेदीदार चौकशी करत अशा ऍक्सिडेंटयुक्त घरांना खरेदी करू शकतो. टोकियोत आता अशा कथित भुताटकीयुक्त घरांची विशेष विक्री होतेय.
अनेकदा बाजारमूल्यावर 50 टक्क्यांची सूट दिल्यावरही काही घरांची विक्री होत नाही. अशा स्थितीत कंपनी या घरांचे स्पेशल क्लीनिंग करविते. याकरता कंपनी घरांमध्ये तोडफोड करून काही हिस्से नव्याने तयार करते. काही खरेदीदार अधिक रक्कम देण्यासही तयार असतात. आमचा उद्देश अशाप्रकारच्या ऍक्सिडेंट प्रॉपर्टीची प्रतिमा बदलणे असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. टोकियोत अशाप्रकारच्या अनेक ऍक्सिडेंट प्रॉपर्टी आहेत.